Monday, June 7, 2021

मरायचे आहे


 जीवनावर विजय

 मिळवून जगायचे आहे

कर्तृत्वावर आरूढ होऊन

लढायचे आहे
जातीयवादाचे विषवल्ली
उखडून काढायची आहे
समतेचं लहानसं रोपटं
वाढवायचं आहे
आपापसातील वांशिक हिंसाचार
थांबवायचा आहे
अस्पृश्यतेचा हा कलंक
धुवून काढायचा आहे
सत्याची दुधारी तलवार
हातात घेऊन
असत्याचा वृक्ष
तोडायचा आहे
राष्ट्रीय एकात्मता
वाढीस लावायची आहे
विकृत प्रवृत्तीचा नायनाट
करायचा आहे
देशात अस्थिरता माजवणाऱ्याचे कट
उधळून लावायचे आहेत
भारताचे अखंडत्व
कायम टिकून ठेवायचे आहे
प्रत्येकाच्या मनात राष्ट्राविषयी
प्रेमाचे बीज रुजवायचे आहे
राष्ट्रासाठी कशाही परिस्थितीत
मरायचे आहे

अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

साथ

 सप्तपदीच्या साथ फेऱ्या घालण्यासाठी

साथ तुझी हवी होती

माझी तुझ्याबद्दलची कल्पना

अगदीच हि नवी होती

भविष्यात भवसागर पार करण्यासाठी

साथ तुझी हवी होती

संपूर्ण भवसागर तरून जाण्याची

माझी कल्पना हि भावी होती

जगात स्वाभिमानाने जगण्यासाठी

साथ तुझी हवी होती

सकल जनसामान्यांना माहित आमची

अजरामर हि प्रीती होती

दुःखाचा प्रसंग ओढावल्यावर

शुश्रूषा करण्यासाठी

साथ तुझी हवी होती

नायनातून दोन थेम्ब गाळण्यासाठी

जीर्ण तुझी माझी नाती होती

मरणास कवटाळण्यास गेलेला आत्मा

परत आणण्यासाठी

साथ तुझी हवी होती

माझ्यातुझ्यातील नाजूक बंधन तोडणारी

खराब हि नियती होती


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड


विरह

 जीर्ण कटू स्मृतींना

आता तरी तू विसरून जा

माझ्या हळव्या भावनांना

अस्ताव्यस्त तू पसरून जा

बोलली नाहीस तरी

नयनबानान अंतःकरण छेदून जा

माझ्या हृदयातील तुझीच प्रतिमा

तू तुझ्या नयनतीराने भेदून जा

चार भिंतीतील जीवनाला

तू कायमच मुक्त करून जा

तुझी पुसटशी आठवण

तू माझ्या हृदयावर कोरून जा

ईश्वराने जोडलेली नाती

तू आता तोडून जा

माझी डळमळती जीवननौका

तू तुझ्या हाताने मोडून जा

फुल उमलण्यापूर्वीच कळीच्या अवस्थेत

तू कुणाकुणातरी खुडून जा

माझ्या सागरासमान दुःखात

तू काही क्षण बुडून जा

दूर दूर जाताना तरी

एकदा आपल्या गावाचं क्षितिज पाहून जा

आपल्या गावाचं क्षितिज पाहून जा


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड


राजकारणी चारोळ्या

 छोट्या वैशालीला हृदयाचे ऑपेरेशन

मोदींना पत्र पाठवल्यामुळे झाले

रुबी hall हॉस्पिटलच्या दिलदार पणामुळे

चिमुकलीचे प्राण वाचले


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


कॉंग्रेस मध्ये राजीनामा सत्र झाले सुरु

कॉंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न मनी धरू

ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू

राहुलच्या नेतृत्त्वात परत एकदा हरू


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


अजित पवारांना धरणात मूतण्याच्या विधानावर

झाली उपरती

आता म्हणत आहेत

बोलताना तोल सांभाळा नाहीतर

जनता मातीत खपवती


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


खडसेचा राजीनामा घेवून

भाजप झाला सेफ

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला

ठोकली नवी मेख


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


मोदी सरकारच्या कामगिरीवर जनता जाम खुश

कॉंग्रेसला मुद्दा नसल्यामुळे

असहीस्नुता मुद्दा पुढे करून

augusta कडून घेतली कोट्यावधीची घूस


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


कॉंग्रेसवर काय वेळ आली

बोंडवर लिहून घेता निष्ठा

पुढील निवडणुकीत

जनता दाखवेल इटलीचा कट्टा


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


राहुल सोनिया स्वतःमध्येच व्यस्त

अशाने होईल कॉंग्रेसचा भारतातून अस्त


अजय कुलकर्णी सात्रेकर


मोदीने केला जगभर डंका

कॉंग्रेसचा दिला

राज्याराज्यात दणका


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


मोदीने केला जगभर डंका

आणि कॉंग्रेसचा दिला

राज्याराज्यात दणका


अजय कुलकर्णी सात्रेकर


 

Monday, June 6, 2016

राजकारणी चारोळ्या

अजित पवारांना धरणात मूतण्याच्या विधानावर
झाली उपरती
आता म्हणत आहेत
बोलताना तोल सांभाळा नाहीतर
जनता मातीत खपवती
अजय कुलकर्णी सात्रेकर

खडसेचा राजीनामा घेवून
भाजप झाला सेफ
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला
ठोकली नवी मेख
अजय कुलकर्णी सात्रेकर

मोदी सरकारच्या कामगिरीवर जनता जाम खुश
कॉंग्रेसला मुद्दा नसल्यामुळे
असहीस्नुता मुद्दा पुढे करून
augusta कडून घेतली कोट्यावधीची घूस
अजय कुलकर्णी सात्रेकर

कॉंग्रेसवर काय वेळ आली
बोंडवर लिहून घेता निष्ठा
पुढील निवडणुकीत
जनता दाखवेल इटलीचा कट्टा
अजय कुलकर्णी सात्रेकर

राहुल सोनिया स्वतःमध्येच व्यस्त
अशाने होईल कॉंग्रेसचा भारतातून अस्त
अजय कुलकर्णी सात्रेकर
मोदीने केला जगभर डंका
कॉंग्रेसचा दिला
राज्याराज्यात दणका
अजय कुलकर्णी सात्रेकर

मोदीने केला जगभर डंका
आणि कॉंग्रेसचा दिला
राज्याराज्यात दणका
अजय कुलकर्णी सात्रेकर

Saturday, May 18, 2013

 हे असेच चाऱायचे

आम्ही एका मुऱीच्या मागे ऱागायचे
तिने दुसरीकडे एंगेज असायचे
िरी आम्ही तिच्याळर झुरायचे
हे असेच चाऱायचे
आपल्याऱा सळव माहीि असूनही
तिच्या मागे मागे करायचे
आणि आपऱे हासे करून घ्यायचे
हे असेच चाऱायचे
आपि रोज ऑफिसमध्ये
ऱळकर जायचे पि तिचे दऴवन नाही व्हायचे
हे असेच चाऱायचे
आपि तिच्या कडे पाहून ऱग्नाचा वळचार करायचा
आणि िी एंगेज असल्यामुले परि सोडून द्यायचा
हे असेच चाऱायचे
घरामध्ये सळव ळस्िु घेळून ऱग्न करण्यासाठी ळफडऱांना
भांडायचे आणि परि मुऱी पहा म्हुिून तमत्राऱा सांगायचे
हे असेच चाऱायचे