Monday, June 7, 2021

चारोळ्या

 प्रेम हा अडीच अक्षराचा शब्द आहे

त्यामध्ये अख्ख विश्व बद्ध आहे


एकतर्फी प्रेमाचे फारच

वाइट असते

आभासी प्रतिमा पाहून काढलेली

नाईट असते


प्रेम करने

हा काही गुन्हा नाही

ही संधी आयुष्यात

पुन्हा नाही


तू जवळ नसलीस तरी

माझ्या हुदयात कल येते

तू जवळ नाहीस या कल्पनेने च

ती जगण्याची बल देते


तू जवळ नसशील

तेव्हा तुला पाहव वाटत

पण तू

जवळ नाहीस या कल्पनेने

डोळ्यात पाणी दाटत


 


तुझ्याविना माझं जीवन


जीवनच राहत नाही


खरं सांगतो मित्रहो


मी दिवसा स्वप्न पाहत नाही


तुझं आणि माझं

फारच जवळच नातं आहे

जस तळपणाऱ्या तलवारीच

धारधार पात आहे


परीक्षा संपल्यावर

पुस्तक हातात धरवत नाही

तेही म्हणत

मला तुझ्याशिवाय करमत नाही


प्रेम अश्या व्यक्तीवर करावं

त्याने तिच्यामध्ये किंवा तिने त्यांच्यामध्ये

पूर्णपणे विलीन व्हावं


भारत हा संस्कृती संपन्न देश आहे

प्रत्येकामध्ये अद्यापही

माणुसकीची भावना शेष आहे


—————————————————————————————————————————————-


कारगिल युद्धाच्या वेळी लिहिलेल्या चारोळ्या


कारगिल युद्धाचा

एक मोठा फायदा झाला

राष्ट्रीय ऐक्याचा

एक छोटा कायदा झाला


कारगीलची भूमी आमची

शान आहे पण

पाकड्यासाठी मात्र

ही जिवंतपणीच स्मशान आहे


वीर जवानांच्या बलिदानानी

भारतभू पावन झाली

अनेकींच्या सौभाग्याची

इथेच हवन झाली


मातृभूमी प्रथम

तुझे कर्तव्य पार पाडतो

मगच गावाकडे

खुशालीचा निरोप धाडतो


कारगीलचा संघर्ष

सध्या तरी थांबला

तूर्त त्यांचा मृत्यू

काही काळ लांबला


पाकिस्तानी दहशतवाद्यांचा

काढायचा आहे काटा

तुम्ही सर्वजण

उचला यात खारीचा वाटा


भारतभू च्या रक्षणार्थ

शहीद मी झालो

हे कर्तव्य पार करण्यासाठी

जन्माला मी आलो


लाहोर बस

कारगीलकडे कशी वळली

विश्वासघातकी प्रवृत्तीमुळे

ती सुद्धा हळहळली


मातृभूमीसाठी आम्ही काहीही

करण्यास तयार आहोत

वेळप्रसंगी मृत्यूवरसुद्धा

बिनदिक्कतपणे सवार आहोत


शहीद झालेल्या वीरांना

कोटी कोटी प्रणाम

त्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी

आपल्या जीवनाला दिला पूर्णविराम


मातृभूमीसाठी जेवढं कराल

तेवढं कमी आहे

पुढील जन्मी येथे जन्मण्याची

हीच कोरी हमी आहे


भारतीय सैनिकानो

तुमची किती करावी स्तुती

तुमच्यातुनच निर्माण झाल्या

असंख्य प्रभृती


राष्ट्रासाठी बलिदान करणं

हे आमच्यासाठी मोठं आहे

त्या मानाने मातृभूमीसाठी

आमचं हे कर्तव्य अगदी छोटं आहे


अजय कुलकर्णी सात्रेकर

No comments: