Monday, June 7, 2021

कुणी तरी असाव

 कुणी तरी असाव

दुखात सहभागी होणार

दुःख वाटुन घेणार

आणि दुखात सुखावणार

कुणी तरी असाव

नयनातील अश्रु पुसणार

टाकिचे घाव सोसनार

आणि हृदयात प्रेमाचा अंकुर फुलावनार

कुणी तरी असाव

मनातील वेदना जाननर

अंतर्मन जाननर

कुणी तरी असाव

स्वप्नात हसवणार

अन्ताकरानत विसावनर

अणि क्षणात सुखावणार

कुणी तरी असाव

फुलाप्रमान फुलणार

कलिप्रमान कोमेजनार

आणि नववधू प्रमाण सजणार

कुणी तरी असाव

लाजालुप्रमान लाजणार

संस्कृति प्रमाण वागणार

आई ध्येयाची कास धरनार


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

घर कस असाव

 घर कस असाव

प्रेमान मंतरलेले

रुनानुबंधान जखडलेले

सर्वस्वाने बहरलेले

घर कस असाव

कटुपन नसलेल

असत्यपन गोठलेल

घर कस असाव

अतिथिच्या आथिथ्याच

कृतद्न्याच्या कृताद्न्यतेच

निस्वार्थी बुध्दिच

घर कस असाव

बाल सवंगद्याच

अबाल वृध्दाच

घर कस असाव

अफ़ाट प्रसन्नतेच

अबाधित समृध्दीच


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

हे असच चालायच !!

 हे असच चालायच

नाश्त्यामध्ये रोज पिज्जाची वाट पहावी

आणि कूकने नेमकी पोह्याची प्लेट

आणून द्यावी

हे असच चालायच

आपन तन मन धनाने गूगल सर्च करावा

पण HR ने forwarding निषिध्द करावे

हे असच चालायच

आम्ही मोठ्या मुश्कीलीने bug शोधायचा

आणि डेवलपर ने त्याला feedback द्यावा

हे असच चालायच

lunch मध्ये plastic (कोबी) ची

भाजी असावी

हे असच चालायच

आम्ही उत्साहाने मुलाखतीला जायच

HR ने आम्हाला we will contact you later

अस म्हनाव

हे असच चालायच

आम्ही रोज salarychya अपेक्षेने HR शी मीटिंग करावी

त्यानी पुढील आठवड्याची तारीख द्यावी

हे असच चालायच

आपण रोज मोबाईल घेवुन

ओफिस ला याव

आणि रिसेप्शन जवळ

मोबाईल सबमिशंचा बोर्ड दिसावा

हे असच चालायच!!


अजय कुलकर्णी सात्रेकर



चारोळ्या

 प्रेम हा अडीच अक्षराचा शब्द आहे

त्यामध्ये अख्ख विश्व बद्ध आहे


एकतर्फी प्रेमाचे फारच

वाइट असते

आभासी प्रतिमा पाहून काढलेली

नाईट असते


प्रेम करने

हा काही गुन्हा नाही

ही संधी आयुष्यात

पुन्हा नाही


तू जवळ नसलीस तरी

माझ्या हुदयात कल येते

तू जवळ नाहीस या कल्पनेने च

ती जगण्याची बल देते


तू जवळ नसशील

तेव्हा तुला पाहव वाटत

पण तू

जवळ नाहीस या कल्पनेने

डोळ्यात पाणी दाटत


 


तुझ्याविना माझं जीवन


जीवनच राहत नाही


खरं सांगतो मित्रहो


मी दिवसा स्वप्न पाहत नाही


तुझं आणि माझं

फारच जवळच नातं आहे

जस तळपणाऱ्या तलवारीच

धारधार पात आहे


परीक्षा संपल्यावर

पुस्तक हातात धरवत नाही

तेही म्हणत

मला तुझ्याशिवाय करमत नाही


प्रेम अश्या व्यक्तीवर करावं

त्याने तिच्यामध्ये किंवा तिने त्यांच्यामध्ये

पूर्णपणे विलीन व्हावं


भारत हा संस्कृती संपन्न देश आहे

प्रत्येकामध्ये अद्यापही

माणुसकीची भावना शेष आहे


—————————————————————————————————————————————-


कारगिल युद्धाच्या वेळी लिहिलेल्या चारोळ्या


कारगिल युद्धाचा

एक मोठा फायदा झाला

राष्ट्रीय ऐक्याचा

एक छोटा कायदा झाला


कारगीलची भूमी आमची

शान आहे पण

पाकड्यासाठी मात्र

ही जिवंतपणीच स्मशान आहे


वीर जवानांच्या बलिदानानी

भारतभू पावन झाली

अनेकींच्या सौभाग्याची

इथेच हवन झाली


मातृभूमी प्रथम

तुझे कर्तव्य पार पाडतो

मगच गावाकडे

खुशालीचा निरोप धाडतो


कारगीलचा संघर्ष

सध्या तरी थांबला

तूर्त त्यांचा मृत्यू

काही काळ लांबला


पाकिस्तानी दहशतवाद्यांचा

काढायचा आहे काटा

तुम्ही सर्वजण

उचला यात खारीचा वाटा


भारतभू च्या रक्षणार्थ

शहीद मी झालो

हे कर्तव्य पार करण्यासाठी

जन्माला मी आलो


लाहोर बस

कारगीलकडे कशी वळली

विश्वासघातकी प्रवृत्तीमुळे

ती सुद्धा हळहळली


मातृभूमीसाठी आम्ही काहीही

करण्यास तयार आहोत

वेळप्रसंगी मृत्यूवरसुद्धा

बिनदिक्कतपणे सवार आहोत


शहीद झालेल्या वीरांना

कोटी कोटी प्रणाम

त्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी

आपल्या जीवनाला दिला पूर्णविराम


मातृभूमीसाठी जेवढं कराल

तेवढं कमी आहे

पुढील जन्मी येथे जन्मण्याची

हीच कोरी हमी आहे


भारतीय सैनिकानो

तुमची किती करावी स्तुती

तुमच्यातुनच निर्माण झाल्या

असंख्य प्रभृती


राष्ट्रासाठी बलिदान करणं

हे आमच्यासाठी मोठं आहे

त्या मानाने मातृभूमीसाठी

आमचं हे कर्तव्य अगदी छोटं आहे


अजय कुलकर्णी सात्रेकर

आठवण

 सुंदर सजवलेलं घर

सुंदर जोडलेली नाती

त्यात तुझीच फक्त कमी होती

तुझं निरागस रूप

तुझी नाजूक काय

तशी तुझी होती

माझ्यावर जीवापाड माया

क्षणोक्षणी नेहमी

तुझाच ध्यास

कधी येशील समीप

हीच माझी आस

सांज सांयकाळी

सतत तुझीच आठवण

कधी करशील तू

माझी मनात साठवण


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

मदिरा (दारू)

 उध्द्वस्त लाखोंचे संसार

घरात दारूचा संचार

कंटाऊन गेली नार

घरात अन्नाची मारामार

दारू घुसली घरात

जोम आला मारत

दारूशिवाय नाही करमत

आपल्या धुंदीत बरळत

धुंद तिच्यात तासूनतास

संसाराचा होतो ऱ्हास

खाण्यास मिळेना घास

सारखा दारूचा सहवास

दारू पिण्यात वाटते मजा

कंगाल होतो धनवान राजा

तो आयुष्यातून होतो वजा

हीच असते त्याची सजा

नका लागू दारूच्या नादी

ती करते आयुष्याची बरबादी


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

ती जाते तेव्हा

 त्या रेशमी क्षणाची

आठवण ठेवून गेली

माझ्या अव्यक्त भावना

जाताना घेऊन गेली

माझ्या सुंदर स्वप्नाची

चांदणी होऊन गेली

माझ्या अतृप्त दुःखसागरात

बिनदिक्कतपणे पोहून गेली

सुखाच्या चार क्षणाची

पाहुनी होऊन गेली

गडगडताना मात्र जलद

दामिनी होऊन गेली

माझ्या जीवनातील

अंधकार घालऊन गेली

तिचा तेवत जीवनदीप

कायमचा मालवून गेली


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

मरायचे आहे


 जीवनावर विजय

 मिळवून जगायचे आहे

कर्तृत्वावर आरूढ होऊन

लढायचे आहे
जातीयवादाचे विषवल्ली
उखडून काढायची आहे
समतेचं लहानसं रोपटं
वाढवायचं आहे
आपापसातील वांशिक हिंसाचार
थांबवायचा आहे
अस्पृश्यतेचा हा कलंक
धुवून काढायचा आहे
सत्याची दुधारी तलवार
हातात घेऊन
असत्याचा वृक्ष
तोडायचा आहे
राष्ट्रीय एकात्मता
वाढीस लावायची आहे
विकृत प्रवृत्तीचा नायनाट
करायचा आहे
देशात अस्थिरता माजवणाऱ्याचे कट
उधळून लावायचे आहेत
भारताचे अखंडत्व
कायम टिकून ठेवायचे आहे
प्रत्येकाच्या मनात राष्ट्राविषयी
प्रेमाचे बीज रुजवायचे आहे
राष्ट्रासाठी कशाही परिस्थितीत
मरायचे आहे

अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

साथ

 सप्तपदीच्या साथ फेऱ्या घालण्यासाठी

साथ तुझी हवी होती

माझी तुझ्याबद्दलची कल्पना

अगदीच हि नवी होती

भविष्यात भवसागर पार करण्यासाठी

साथ तुझी हवी होती

संपूर्ण भवसागर तरून जाण्याची

माझी कल्पना हि भावी होती

जगात स्वाभिमानाने जगण्यासाठी

साथ तुझी हवी होती

सकल जनसामान्यांना माहित आमची

अजरामर हि प्रीती होती

दुःखाचा प्रसंग ओढावल्यावर

शुश्रूषा करण्यासाठी

साथ तुझी हवी होती

नायनातून दोन थेम्ब गाळण्यासाठी

जीर्ण तुझी माझी नाती होती

मरणास कवटाळण्यास गेलेला आत्मा

परत आणण्यासाठी

साथ तुझी हवी होती

माझ्यातुझ्यातील नाजूक बंधन तोडणारी

खराब हि नियती होती


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड


विरह

 जीर्ण कटू स्मृतींना

आता तरी तू विसरून जा

माझ्या हळव्या भावनांना

अस्ताव्यस्त तू पसरून जा

बोलली नाहीस तरी

नयनबानान अंतःकरण छेदून जा

माझ्या हृदयातील तुझीच प्रतिमा

तू तुझ्या नयनतीराने भेदून जा

चार भिंतीतील जीवनाला

तू कायमच मुक्त करून जा

तुझी पुसटशी आठवण

तू माझ्या हृदयावर कोरून जा

ईश्वराने जोडलेली नाती

तू आता तोडून जा

माझी डळमळती जीवननौका

तू तुझ्या हाताने मोडून जा

फुल उमलण्यापूर्वीच कळीच्या अवस्थेत

तू कुणाकुणातरी खुडून जा

माझ्या सागरासमान दुःखात

तू काही क्षण बुडून जा

दूर दूर जाताना तरी

एकदा आपल्या गावाचं क्षितिज पाहून जा

आपल्या गावाचं क्षितिज पाहून जा


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड


राजकारणी चारोळ्या

 छोट्या वैशालीला हृदयाचे ऑपेरेशन

मोदींना पत्र पाठवल्यामुळे झाले

रुबी hall हॉस्पिटलच्या दिलदार पणामुळे

चिमुकलीचे प्राण वाचले


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


कॉंग्रेस मध्ये राजीनामा सत्र झाले सुरु

कॉंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न मनी धरू

ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू

राहुलच्या नेतृत्त्वात परत एकदा हरू


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


अजित पवारांना धरणात मूतण्याच्या विधानावर

झाली उपरती

आता म्हणत आहेत

बोलताना तोल सांभाळा नाहीतर

जनता मातीत खपवती


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


खडसेचा राजीनामा घेवून

भाजप झाला सेफ

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला

ठोकली नवी मेख


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


मोदी सरकारच्या कामगिरीवर जनता जाम खुश

कॉंग्रेसला मुद्दा नसल्यामुळे

असहीस्नुता मुद्दा पुढे करून

augusta कडून घेतली कोट्यावधीची घूस


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


कॉंग्रेसवर काय वेळ आली

बोंडवर लिहून घेता निष्ठा

पुढील निवडणुकीत

जनता दाखवेल इटलीचा कट्टा


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


राहुल सोनिया स्वतःमध्येच व्यस्त

अशाने होईल कॉंग्रेसचा भारतातून अस्त


अजय कुलकर्णी सात्रेकर


मोदीने केला जगभर डंका

कॉंग्रेसचा दिला

राज्याराज्यात दणका


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


मोदीने केला जगभर डंका

आणि कॉंग्रेसचा दिला

राज्याराज्यात दणका


अजय कुलकर्णी सात्रेकर