Monday, June 7, 2021

मदिरा (दारू)

 उध्द्वस्त लाखोंचे संसार

घरात दारूचा संचार

कंटाऊन गेली नार

घरात अन्नाची मारामार

दारू घुसली घरात

जोम आला मारत

दारूशिवाय नाही करमत

आपल्या धुंदीत बरळत

धुंद तिच्यात तासूनतास

संसाराचा होतो ऱ्हास

खाण्यास मिळेना घास

सारखा दारूचा सहवास

दारू पिण्यात वाटते मजा

कंगाल होतो धनवान राजा

तो आयुष्यातून होतो वजा

हीच असते त्याची सजा

नका लागू दारूच्या नादी

ती करते आयुष्याची बरबादी


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

No comments: